दैववादाची काजळी शिक्षणच दूर करील
आज गोरगरीब, बहुजनांचं आणि रात्रशाळांतील विद्यार्थ्यांचं शिक्षण ज्या पद्धतीनं बंद केलं जात आहे, ही बहुजन समाजाच्या दृष्टीनं घातक गोष्ट आहे. २००९ साली शिक्षणाच्या हक्काचा कायदा केला असतानाही मोफत शिक्षणाची वाट लावली आहे. शिक्षण भांडवलदारांच्या दारात ‘बटिक’ म्हणून पाणी भरणार आहे. असं असतानाही समाजातील अभ्यासक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, वृत्तपत्रं, प्रसारमाध्यमं, लोकप्रतिनिधी सारे मूग गिळून बसले आहेत.......